Matthew 8:4 — Compare Translations

5 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
“हे जे घडले ते कुणाला सांगू नकोस, तर जाऊन स्वत:ला याजकांना दाखव आणि तू कुष्ठरोगमुक्त झालास ह्याचे प्रमाण म्हणून मोशेने ठरवून दिलेले अर्पण वाहून टाक. ह्यामुळे तू शुद्ध झाल्याचे लोकांना कळेल.”
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
नंतर येशूने त्याला म्हटले, “पाहा, हे कोणाला सांगू नकोस; तर जाऊन स्वतःला याजकाला दाखव आणि तू बरा झालास ह्याचे सर्वांना प्रमाण म्हणून मोशेने नेमलेले अर्पण कर.”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मग येशूने त्याला म्हटले, “पाहा, हे कोणाला सांगू नकोस; तर जाऊन ‘स्वतःस याजकाला दाखव’ आणि त्यांना प्रमाण पटावे म्हणून तुझ्या शुद्धीकरता, मोशेने नेमलेले अर्पण वाहा.”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
मग येशू त्याला म्हणाले, “हे कोणाला सांगू नकोस. परंतु जा, स्वतःस याजकाला दाखव व कुष्ठरोग बरे झाल्यानंतर शुद्धीकरणाचे प्रमाण म्हणून मोशेच्या नियमशास्त्राप्रमाणे जे अर्पण करावयाचे असते, ते कर.”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मग येशूने त्यास म्हटले, “पाहा, हे कोणाला सांगू नको; तर जाऊन स्वतःस याजकाला दाखव आणि त्यांना सत्यतेची साक्ष पटावी म्हणून तुझ्या शुद्धीकरता, मोशेने नेमलेले अर्पण वाहा.”