Matthew 8:9 — Compare Translations

5 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
कारण मी स्वत: दुसऱ्या अधिकाऱ्यांच्या हाताखाली काम करतो आणि माझ्या हाताखाली देखील अनेक शिपाई आहेत. मी एखाद्याला जा म्हणतो आणि तो जातो आणि दुसऱ्याला ये म्हटल्यावर तो येतो. मी माझ्या नोकराला अमूक कर असे सांगतो आणि तो ते करतो.”
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
मीही जबाबदार मनुष्य आहे आणि माझ्या हाताखाली सैनिक असून मी एकाला जा म्हटले की, तो जातो, दुसऱ्याला ये म्हटले की, तो येतो, माझ्या नोकराला अमुक कर म्हटले की, तो तसे करतो.”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
कारण मीही ताबेदार मनुष्य आहे आणि माझ्या हाताखाली शिपाई असून मी एकाला ‘जा’ म्हटले की तो जातो, दुसर्‍याला ‘ये’ म्हटले की तो येतो, आणि माझ्या दासाला ‘अमुक कर’ म्हटले की तो ते करतो.”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
कारण मी स्वतः अधिकाराच्या अधीन असलेला मनुष्य असून माझ्या अधिकाराखाली सैनिक आहेत. मी एकाला, ‘जा,’ म्हटले की तो जातो आणि दुसर्‍याला, ‘ये,’ म्हटले की तो येतो आणि माझ्या नोकराला, ‘हे कर,’ अथवा ‘ते कर,’ असे म्हटले तर तो ते करतो.”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
कारण मीही एक अधिकारी असून मा‍झ्या हाताखाली शिपाई आहेत. मी एकाला ‘जा’ म्हणले की तो जातो, दुसर्‍याला ‘ये’ म्हणले की तो येतो आणि माझ्या दासास ‘हे कर’ म्हणले की तो ते करतो.”