Matthew 9:14 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
मग योहानाचे शिष्य त्याच्याकडे आले आणि त्यांनी त्याला विचारले, “आम्ही व परुशी पुष्कळ वेळा उपास करतो. पण तुझे शिष्य उपास करीत नाहीत. ते का?”
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
त्या वेळी योहानचे शिष्य येशूकडे येऊन त्याला म्हणाले, “आम्ही व परुशी उपवास करतो परंतु आपले शिष्य उपवास करत नाहीत, ह्याचे कारण काय?”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
त्या वेळेस योहानाचे शिष्य त्याच्याकडे येऊन त्याला म्हणाले, “आम्ही व परूशी पुष्कळ उपास करतो, पण आपले शिष्य उपास करत नाहीत, ह्याचे कारण काय?”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
एके दिवशी बाप्तिस्मा करणार्या योहानाचे शिष्य येशूंकडे आले आणि त्यांनी त्यांना प्रश्न केला, “गुरुजी, आम्ही आणि परूशी लोक उपास करतो तसे तुमचे शिष्य का करत नाहीत?”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मग योहानाचे शिष्य त्याच्याकडे आले आणि त्यांनी त्यास विचारले, “आम्ही व परूशी पुष्कळ उपवास करतो. पण तुझे शिष्य उपवास करीत नाहीत. ते का?”