Matthew 9:17 — Compare Translations

5 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
तसेच नवा द्राक्षारस जुन्या कातडी पिशवीत कोणी घालीत नाहीत, घातला तर पिशव्या फुटतात व त्यांचा नाश होतो. म्हाणून लोक नवा द्राक्षारस नव्या पिशव्यात घालतात. तेव्हा दोन्हीही चांगले राहतात.”
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
तसेच कोणी नवा द्राक्षारस जुन्या बुधल्यांत भरत नाही. भरला तर बुधले फुटून द्राक्षारस वाया जातो आणि बुधले निकामी होतात. म्हणून नवा द्राक्षारस नव्या बुधल्यांत भरतात म्हणजे दोन्ही टिकतात.”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तसेच कोणी नवा द्राक्षारस जुन्या बुधल्यात घालत नाहीत; घातला तर बुधले फुटून द्राक्षारस सांडतो आणि बुधले बिघडतात; तर नवा द्राक्षारस नव्या बुधल्यात घालतात म्हणजे दोन्ही नीट राहतात.”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
त्याचप्रमाणे कोणीही नवा द्राक्षारस जुन्या बुधल्यांमध्ये ओतीत नाही. नाही तर, नवीन द्राक्षारसामुळे बुधले फुटून जातील; द्राक्षारस वाहून जाईल आणि बुधल्याचा नाश होईल. नाही, तसे होऊ नये म्हणून ते नवा द्राक्षारस नवीन बुधल्यांमध्ये ओततात आणि दोन्ही सुरक्षित राहतात.”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तसेच कोणीही नवा द्राक्षरस जुन्या कातडी पिशवीत घालीत नाहीत, घातला तर त्या पिशव्या फुटतात व द्राक्षरस सांडतो; तर नवा द्राक्षरस नव्या कातडी पिशव्यांत घालतात. म्हणजे दोन्हीही टिकून राहतात.”