Matthew 9:23 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
मग येशू त्या यहूदी सभास्थानाच्या अधिकाऱ्याच्या घरात आला. तेव्हा त्याने बासरी वाजविणाऱ्या व गोंधळ करणाऱ्या जमावाला पाहिले.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
नंतर येशू त्या अधिकाऱ्याच्या घरी गेला तेव्हा अंत्यविधीसाठी आलेल्या पावा वाजवणाऱ्यांना व गलबला करणाऱ्या लोकांना पाहून येशू म्हणाला,
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मग येशू त्या अधिकार्याच्या घरात जाऊन पावा वाजवणार्यांना व गलबला करणार्या लोकसमुदायाला पाहून म्हणू लागला,
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
येशू त्या सभागृहाच्या अधिकार्याच्या घरी आले, तेव्हा त्यांनी आकांत करणारा मोठा जमाव तिथे पाहिला. लोक बासरी वाजवून शोक करीत होते.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मग येशू त्या यहूदी सभास्थानाच्या अधिकाऱ्याच्या घरात आला. तेव्हा त्याने बासरी वाजविणाऱ्या व रडून गोंधळ करणाऱ्या जमावाला पाहीले,