Micah 1:16 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
म्हणून केसा कापा, मुंडन करा. का? कारण तुम्हाला प्रिय असलेल्या मुलांसाठी तुम्ही शोक कराल. गरुडा प्रमाणे तुम्ही स्वत:चे डोक्याचे मुंडन करुन कराल. गरुडा प्रमाण तुम्ही स्वत:चे डोक्याचे मुंडन करुन घ्या आणि दु:ख प्रगट करा. का? कारण तुमच्या मुलांना तुमच्यापासून दूर नेले जाईल.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तू आपले डोके भादर, तुझ्या लाडक्या मुलांमुळे केसांचे वपन कर, गिधाडाप्रमाणे आपल्या डोक्याचे टक्कल वाढव; कारण ती बंदिवान होऊन तुझ्यापासून गेली आहेत.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
ज्या मुलांमध्ये तुम्ही आनंदी आहात त्यांच्यासाठी शोक करताना आपले डोके मुंडण करा; गिधाडासारखे तुमच्या डोक्याचे मुंडण करा, कारण ते तुमच्यापासून गुलाम म्हणून जातील.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
म्हणून तू आपले केस काप व मुंडन कर. कारण तुम्हास प्रिय असलेल्या मुलांसाठी तुम्ही शोक कराल. गरुडा प्रमाणे तुम्ही स्वत:च्या डोक्याचे मुंडन करा. कारण तुमच्या मुलांना तुमच्यापासून दूर नेले जाईल.