Micah 1:7 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
तिच्या सर्व मूर्तीचे तुकडे तुकडे केले जातील. तिच्या वेश्येची संपत्ती (मूर्ती) आगीमध्ये भस्मसात होईल. तिच्या सर्व खोट्या दैवतांच्या पुतळ्यांचा मी नाश करीन. का? कारण शोमरोनने माझ्याशी विश्वासघात करुन सर्व धन मिळविले. म्हणून माझ्याशी एकनिष्ठ नसलेल्या लोकांमार्फत तिची संपत्ती घेतली जाईल
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तिच्या सर्व कोरीव मूर्तींचे फोडून तुकडे करण्यात येतील; तिच्या व्यभिचाराची सर्व कमाई अग्नीने जाळण्यात येईल; तिच्या सर्व मूर्तींची मी नासधूस करीन; वेश्येच्या कमाईने तिने त्या मिळवल्या म्हणून वेश्येची कमाई अशा त्या पुनरपि होतील.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तिच्या सर्व मूर्ती फोडून तुकडे करण्यात येतील; तिच्या मंदिरातील सर्व भेटवस्तू अग्नीत भस्म होतील; मी तिच्या सर्व प्रतिमा नष्ट करेन. कारण तिने आपल्या भेटवस्तू वेश्याव्यवसाय करून मिळवल्या आहेत, आणि त्या पुन्हा वेश्यावृत्तीची मजुरी म्हणून वापरली जाईल.”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तिच्या सर्व मूर्तीं ठेचून तुकडे तुकडे केले जातील. तिच्या कोरीव मूर्ती आगीमध्ये भस्मसात केल्या जातील. तिच्या सर्व खोट्या दैवतांच्या मूर्तींचा मी नाश करीन, कारण तिने वेश्येच्या कमाईने त्या मिळवल्या आहेत, म्हणून वेश्येच्या वेतनास त्या परत जातील.