Micah 2:1 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
पाप करण्याचे बेत करणाऱ्यांवर संकट येईल. ते लोक आपल्या शय्येवर दुष्ट बेत करीत पडतात आणि सकाळी फटफटताच, योजलेली वाईट कर्मे करतात. का? कारण त्यांच्या इच्छेप्रमाणे करण्याचे सामर्थ्य त्यांच्या हाती आहे म्हणून.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
जे अनर्थाचा संकल्प करतात व बिछान्यावर पडल्या-पडल्या दुष्टतेची योजना करतात त्यांना धिक्कार असो! सकाळ उजाडताच ते आपला बेत सिद्धीस नेतात, कारण हे करण्याचे सामर्थ्य त्यांच्या हाती आहे.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
जे वाईट कृत्याची योजना करतात, जे आपल्या अंथरुणावर कट रचतात, त्यांचा धिक्कार असो! पहाट होताच ते त्यांचा कट पूर्ण करतात कारण हे सामर्थ्य त्यांच्या हातात असते.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
जे पाप करण्याचे योजीतात व आपल्या पलंगावर दुष्ट बेत करतात, त्यांना हायहाय. आणि सकाळ होताच ते आपले योजलेले वाईट काम करतात, कारण त्यांच्याजवळ सामर्थ्य आहे.