Micah 2:11 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
ह्या लोकांना माझे ऐकावयाचे नाही. पण एखादा खोटे सांगू लागला, तर ते स्वीकारतील. जर खोटा संदेष्टा येऊन म्हणाला, “भविष्यकाळात चांगले दिवस येतील, द्राक्षरस आणि मद्याचा सुकाळ होईल, तर ते त्या खोट्या प्रेषितावर विश्वास ठेवतील.”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
वायफळ व खोट्या चालीचा कोणी मनुष्य खोटे बोलून म्हणेल की, “द्राक्षारस व मद्य ह्यांचे मी भाकीत करीन,” तर तो ह्या लोकांचा संदेष्टा होईल.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
जर एखादा लबाड आणि फसवणूक करणारा येऊन म्हणाला, ‘मी तुम्हाला भरपूर द्राक्षारस व मद्याची भविष्यवाणी करेन,’ तर अशीच व्यक्ती या लोकांसाठी योग्य संदेष्टा होईल!
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
जर एखादा असत्याच्या आत्म्याने चालतांना खोटे सांगून म्हणेल की, “मी द्राक्षरस आणि मद्य यांविषयी भविष्य सांगेन,” तर तो देखील या लोकांचा भविष्यावादी होईल.