Micah 2:13 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
फोडणारा लोकांना ढकलून पुढे जाईल व लोकांच्या पुढे चालेल. तो वेशीचे दार फोडील आणि लोक ते गाव सोडतील. त्या लोकांचा राजा त्यांच्यापुढे चालेल. परमेश्वर सर्व लोकांच्या पुढे असेल.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तोडफोड करणारा त्यांच्यापुढे चालत आहे; ते वेस फोडून वेशीतून पार निघून गेले; त्यांचा राजा त्यांच्यापुढे चालत आहे व परमेश्वर त्यांच्या अग्रभागी आहे.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
जे कुंपण तोडून मार्ग उघडणारे त्यांच्या पुढे जातील; ते द्वार तोडून त्यातून बाहेर जातील. त्यांचा राजा त्यांच्या पुढे जाईल, याहवेह त्यांचे पुढारी असतील.”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
फोडणारा त्यांच्यापुढे जाईल व लोकांच्या पुढे चालेल. ते सुटून वेशीजवळ जाऊन तिच्यातून निघाले आहेत; आणि त्यांचा राजा त्यांच्यापुढे चालून गेला आहे. परमेश्वर त्यांचा पुढारी आहे.