Micah 4:12 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
त्या लोकांनी त्यांचे बेत केलेत. पण परमेश्वर काय बेत करीत आहे. हे त्यांना माहीत नाही. परमेश्वराने त्या लोकांना विशेष उद्देशाने येथे आणले आहे. ते लोक, खळ्यातील धान्याप्रमाणे चिरडले जातील.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
पण त्यांना परमेश्वराचे विचार कळत नाहीत, त्याचे संकल्प ते समजत नाहीत; कारण खळ्यासाठी पेंढ्या गोळा करतात तसे त्याने त्यांना गोळा केले आहे.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
पण त्यांना याहवेहचे विचार माहीत नाहीत; त्यांना याहवेहच्या योजना समजत नाही, खळ्यातील पेंढ्यांप्रमाणे याहवेहने त्यांना गोळा केले आहे.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
संदेष्टा म्हणतो, त्यांना परमेश्वराचे विचार कळत नाहीत, आणि त्यांना त्याच्या योजना समजत नाहीत. कारण जशा पेंढ्या खळ्यात गोळा करतात तसे परमेश्वराने त्यांना गोळा केले आहे.