Micah 6:15 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
तुम्ही बी पेराल. पण तुम्हाला धान्य मिळणार नाही. जैतुनांपासून तेल काढण्याचा तुम्ही प्रयत्न कराल, पण तुम्हाला तेल मिळणार नाही. तुम्ही द्राक्षांचा चुराडा कराल पण तुम्हाला पुरेसा रस पिण्यास मिळणार नाही.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तू पेरशील, पण कापणी करणार नाहीस; तू जैतून वृक्षाची फळे तुडवशील, पण त्याच्या तेलाने अभ्यंग करणार नाहीस; द्राक्षीचा उपज तुडवशील, पण तू द्राक्षारस पिणार नाहीस.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तू पेरणी करशील पण कापणी करणार नाही; तुम्ही जैतून फळे तुडवाल, पण ते तेल वापरणार नाही, तू द्राक्षे चिरडशील, पण त्याचा द्राक्षारस पिणार नाही.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तू पेरशील, पण कापणी करणार नाही; तू जैतूनांपासून तेल काढण्यासाठी ते तुडवशील, पण त्याचे तेल स्वत:ला लावणार नाही; तू द्राक्ष तुडवशील, पण त्याचा रस पिणार नाही.