Micah 6:16 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
का? कारण तुम्ही अम्रीचे नियम पाळता. अहाबचे घराणे करते त्या सर्व वाईट गोष्टी तुम्ही करता. तुम्ही त्यांच्या शिकवणुकीप्रमाणे वागता. म्हणून मी तुमचा नाश होऊ देईन. तुमची नष्ट झालेली नगरी पाहून लोक विस्मयोदगार काढतील. माझे लाजिरवाणे लोक कैदी म्हणून नेले जातील इतर राष्ट्रे तुम्हाला लाजिरवाणे करतील. ती लाज तुम्हाला बाळगावी लागेल.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
अम्रीचे कायदे तुम्ही पाळता, अहाबाच्या घराण्याच्या चालीरीती तुम्ही पाळता, व त्यांच्या तत्त्वांप्रमाणे तुम्ही चालता, म्हणून तुमचा नाश होईल, त्याच्या रहिवाशांची निर्भर्त्सना होईल असे मी करीन; माझ्या लोकांची अप्रतिष्ठा तुम्हांला सोसावी लागेल.”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तू ओमरीचे नियम आणि अहाबाच्या घराण्याच्या सर्व चालीरीती पाळल्या आहेत; तुम्हीही त्यांच्या रूढी पाळल्या आहेत. म्हणून मी तुझा नाश करेन व तुझ्या प्रजेची थट्टा करेन; तू राष्ट्रांची निंदा सहन करशील.”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
कारण अम्रीचे नियम पाळले जातात आणि अहाबाच्या घराण्याची सर्व कार्ये करण्यात येतात. तुम्ही त्यांच्या मसलती प्रमाणे चालता, म्हणून मी तुझा व तुझ्या शहराचा नाश करीन व त्याच्या रहिवाशांचा उपहास होईल आणि माझ्या लोकांची अप्रतिष्ठा तुम्हास सोसावी लागेल.