Micah 7:1 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
मी अस्वस्थ झालो आहे कारण माझी स्थिती गोळा केलेल्या फळासारखी आणि अगोदरच द्राक्षे तोडल्यामुळे खाण्यासाठी द्राक्षे शिल्लक नाहीत तशी झाली आहे. खाण्यासाठी द्राक्षे शिल्लक नाहीत. मला आवडणारी पहिल्या बहराची अंजिरे अजिबात नाहीत.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
कोण ही माझी विपत्ती! उन्हाळ्यातील फळे काढून घेतल्यावर जशी झाडावर काही राहतात, द्राक्षीच्या वेलीवर जसा सरवा राहतो, तसा मी झालो आहे; खायला द्राक्षांचा एक घोसही राहिला नाही; माझ्या जिवाला आवडेल असा पहिल्या बाराचा अंजीर राहिला नाही.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
काय ही माझी दुःखद स्थिती! मी द्राक्षमळ्यातील उन्हाळी फळे गोळा करणार्यासारखा आहे; खाण्यास द्राक्षांचा घडही उरला नाही, अंजिराच्या ज्या पहिल्या फळाची मला इच्छा होती ती सुद्धा नाही.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मला हायहाय! मी अस्वस्थ झालो आहे, कारण माझी स्थिती उन्हाळ्यातल्या वगळ फळांसारखी झाली आहे, काढणीच्या द्राक्षांसारखी झाली आहे, खायला एकही घोंस नाही, पण तरीही प्रथम पिकलेल्या अंजीर फळाची हाव आहे.