Nahum 1:14 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
अश्शूरचा राजा परमेशवर तुझ्याबद्दल पुढील आज्ञा देतो: तुझे नाव लावायला तुझ्या वंशातील कोणीही उरणार नाही. तुझ्या दैवळातील कोरलेल्या मूर्ती व धातूचे पतळे यांचा मी नाश करीन मी तुझे थडगे तयार करत आहे. कारण तुझा विनाश लवकरच ओढवणार आहे.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
परमेश्वराने तुझ्याबद्दल अशी आज्ञा केली आहे की, “तुझ्या बीजाची पुन्हा पेरणी होणार नाही; तुझ्या दैवतांच्या मंदिरातून कोरीव व ओतीव मूर्ती मी नष्ट करीन; मी तुझी कबर तयार करीन, कारण तू हलका ठरला आहेस.”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
हे निनवेह, याहवेहने तुझ्याविषयी आज्ञा दिली आहे: “तुझे नाव पुढे चालविणारी कोणीही संतती राहणार नाही. आणि जी तुझ्या दैवताच्या मंदिरात आहेत ती तुझी दैवते आणि मूर्ती मी नष्ट करेन. मी तुझी कबर तयार करेन, कारण तू तिरस्करणीय आहेस.”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
आणि परमेश्वराने तुझ्याबद्दल आज्ञा दिली आहे की, निनवे, तुझे नाव धारण करणारे तुझ्या वंशातील कोणीही उरणार नाही. मी तुझ्या देवाच्या मंदिरातील कोरलेल्या मूर्ती व ओतीव मूर्ती छेदून टाकीन. मी तुझी कबर खोदून काढील, कारण तू दुष्ट आहेस.