Nahum 2:11 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
कोठे आहे ती सिंहाची गुहा (निनवे)? सिंह-सिंहिणी तेथे राहात होत्या त्यांचे छावे निडर होते.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
सिंहांची गुहा कोठे आहे? तरुण सिंहांची खुराक खाण्याची जागा कोठे आहे? जेथे सिंह, सिंहीण व सिंहाचा छावा ही फिरत असत व कोणी त्यांना भेडसावत नसे ते ठिकाण कोठे आहे?
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
ती सिंहाची गुहा कुठे आहे जिथे ते त्यांच्या बछड्यांचे पालनपोषण करीत असत, जिथे सिंह आणि सिंहिणी जातात, कोवळी मुलेदेखील निर्भयतेने राहात असत, आणि त्यांच्या बछड्यांना कशाचेही भय नसे?
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
आता सिंहाची गुहा कोठे आहे? तरुण सिंहाच्या छाव्याची भक्ष्य खाण्याची जागा कोठे आहे? सिंह आणि सिंहीण त्यांच्या छाव्याबरोबर तेथे फिरत असत, ते तेथे कशालाही भीत नसत ती जागा कोठे आहे?