Nahum 2:12 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
त्यांच्या छाव्यांना आणि सिंहिणींना तृप्त करण्यासाठी सिंहाने (निनवेच्या राजाने) खूप लोकांना मारले त्याची गुहा (निनवे) मानवी शरीरांनी भरली त्याने मारलेल्या स्त्रियांनी त्यांची गुहा भरली.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
सिंह आपल्या छाव्यांसाठी पुरेसे भक्ष्य फाडत असे, आपल्या सिंहिणीसाठी सावजाचा गळा दाबत असे, तो भक्ष्याने आपल्या गुहा, शिकारीने आपल्या गुंफा भरत असे.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
सिंह आपल्या बछड्यांना पुरेलशी शिकार करत असे व आपल्या सिंहिणींना भक्ष्य पुरविण्यासाठी सावजाची नरडी दाबून ठार मारत असे, आपल्या गुहेत ते जमा करीत असत आणि आपली गुहा भक्षांनी भरून टाकीत असत.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
सिंह आपल्या छाव्यांसाठी पुरेसे भक्ष्य फाडून तुकडे करीत असे आणि तो आपल्या सिंहिणीसाठी भक्ष्याचा गळा दाबीत असे आणि तो आपल्या गुहा भक्ष्याने आणि त्याची गुहा शिकारीने भरीत असे.