Nahum 2:13 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
सर्वशक्तिमान परमेश्वर म्हणतो निनवे मी तुझ्याविरुध्द आहे मी तुझे रथ जाळून टाकीन लढाईत मी तुझ्या छाव्यांना ठार मारीन तू पुन्हा पृथ्वीवर कोणाचीही शिकार करणार नाहीस तुझ्या दूतांकडून पुन्हा कधीही लोकांना वाईट बातमी ऐकावी लागणार नाही.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
पाहा, मी तुझ्यावर चालून येत आहे, असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो; मी तिचे रथ जाळीन, त्यांचा धूर निघेल, तुझ्या तरुण सिंहांना तलवार नष्ट करील; मी पृथ्वीवरून तुझे भक्ष्य नाहीसे करीन, तुझ्या जासुदांचा शब्द ह्यापुढे ऐकू येणार नाही.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
सर्वसमर्थ याहवेह जाहीर करतात: “मी तुझ्याविरुद्ध उठलो आहे, मी तुझे रथ भस्म करून त्यांचा धूर करेन, आणि तलवार तुझ्या सिंहाच्या बछड्यांना गिळंकृत करेल. मी पृथ्वीवर तुझ्यासाठी एकही भक्ष ठेवणार नाही. तुझ्या संदेशवाहकांचे आवाज यापुढे कधीही ऐकू येणार नाहीत.”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
पाहा, मी तुझ्याविरुद्ध आहे, असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो, मी तिचे रथ जाळून त्यांचा धूर करीन; आणि तलवार तुझ्या तरुण सिंहास खाऊन टाकील. मी तुझे भक्ष्य तुझ्या देशातून नाहीसे करीन, आणि तुझ्या दूतांचा आवाज ऐकण्यात येणार नाही.