Nahum 2:3 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
त्या सैनिकांच्या ढाली लाल आहेत त्यांचा पोशाख लालभडक आहे लढण्यासाठी सज्ज होऊन उभे राहिलेले त्यांचे रथ अग्नीच्या ज्वाळेप्रमाणे चमड्ढताना दिसत आहेत त्यांचे घोडे सरसावलेले आहेत.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
त्यांच्या वीरांची ढाल तांबडी आहे; लढवय्ये किरमिजी पोशाख ल्यायले आहेत; सज्ज होण्याच्या दिवशी त्यांच्या रथांचे पोलाद अग्नीसारखे चमकत आहे. ते भाले इकडून तिकडे परजत आहेत.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
ज्या दिवसाची त्यांनी तयारी केली आहे; त्या दिवसासाठी रथांवरील धातू चकाकत आहेत, सैनिकांच्या ढाली तांबड्या आहेत; योद्धे किरमिजी पेहराव केलेले आहेत सनोवरचे भाले परजलेले आहेत.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
त्यांच्या वीरांच्या ढाली लाल आहेत आणि शूर माणसे किरमिजी रंगाचे पोषाख नेसले आहेत, त्यांच्या तयारी करण्याच्या दिवशी रथ पोलादाने चमकत आहेत आणि सुरूच्या काठ्यांचे भाले हवेत हालवत आहेत.