Nahum 2:4 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
रथ रस्त्यांतून मोकाटपणे धावत आहेत चौकांमधून ते पुढे-मागे कसेही पळत आहेत ते जळत्या मशालीप्रमाणे किंवा ठिकठिकाणी तळपणाऱ्या विजेप्रमाणे दिसत आहेत.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
रस्त्यांतून रथ बेफाम चालले आहेत, सडकांवर ते एकमेकांवर आदळत आहेत, ते मशालीसारखे दिसत आहेत, ते विजेसारखे धावत आहेत.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
रथही मार्गांवरून बेफामपणे धावत आहेत, चौकातून झपाट्याने मागेपुढे होत आहेत. ते प्रज्वलित मशालीप्रमाणे दिसत आहेत; ते वीजगतीने दौडत आहेत.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
रथ रस्त्यातून वेगाने धावत आहेत; रूंद रस्त्यामधून ते इकडे तिकडे झपाट्याने पळत आहेत, ते मशाली सारखे आणि विजांसारखे धावत आहेत.