Nahum 3:10 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
तरी थेब्जचा पराभव झाला तिच्या लोकांना कैद करून परदेशात नेले गेले. रस्त्यांच्या प्रत्येक चौकात तिच्या लहान मुलांना सैनिकांनी मेर पर्यत मारले. प्रतिष्ठित लोकांना, गुलाम म्हणून कोणी ठेवायचे, हे ठरविण्यासाठी सैनिकांनी चिठ्या टाकल्या त्यांनी थेब्जच्या प्रतिष्ठितांना बेड्या ठोकल्या.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तरी ती हद्दपार झाली, तिला बंदिवान करून नेण्यात आले; तिची मुले रस्त्यांच्या सर्व चवाठ्यांवर आपटून मारण्यात आली; तिच्या सरदारांवर चिठ्ठ्या टाकण्यात आल्या, तिच्या सर्व महाजनांना साखळ्यांनी बांधण्यात आले.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
असे असूनही थीब्जचा पाडाव झाला आणि तिला बंदिवासात नेण्यात आले. तिची बालके रस्त्यांच्या प्रत्येक कोपऱ्यावर दगडांवर आपटून ठार मारण्यात आली. तिच्या अधिकार्‍यांसाठी चिठ्ठ्या टाकण्यात आल्या, तिच्या सर्व प्रतिष्ठित व्यक्तींना साखळदंडानी बांधण्यात आले.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तरी थेबेसला पाडाव करून नेण्यात आले, ती बंदीवासात गेली तिची तरुण मुले प्रत्येक मुख्य रस्त्यात आपटून तुकडे करून मारण्यात आली. तिच्या शत्रूंनी प्रतिष्ठीत मनुष्यांवर चिठ्ठ्या टाकल्या आणि त्यांनी तिच्या सर्व महान मनुष्यांना साखळ्यांनी बांधून नेले.