Nahum 3:12 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
पण, निनवे, तुझ्या सर्व मजबूत जागा अंजिराच्या झाडांप्रमाणे होतील अंजिरे पिकताच, कोणीही येऊन झाड हलविते आणि अंजिरे त्याच्या तोंडात पडतात. तो ती खातो आणि निघून जातो.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
पहिल्या बाराच्या पिकलेल्या अंजिरांच्या झाडाप्रमाणे तुझे सर्व दुर्ग होतील; झाडे हलवली म्हणजे अंजीर खाणार्याच्या तोंडी पडतात.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तुझे सर्व गड अंजिरांच्या झाडासारखे होतील त्यांच्या प्रथम पिकलेल्या फळांगत; जेव्हा ते हलविले जातात, तेव्हा ते नेमके खाणाऱ्याच्या तोंडात पडतात.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तुझे सर्व दुर्ग प्रारंभी पिकलेल्या अंजिराच्या झाडाप्रमाणे होतील. जर ते हालविले, तर ते खाणाऱ्याच्या तोंडात पडतात.