Nahum 3:17 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
तुझे सरकारी अधिकारीही असेच आहेत. टोळ थंड वेळी दगडी भिंतीवर बसतात. पण ऊन तापताच भिंत गरम होते, तेव्हा ते डडून जातात व कोठे जातात, ते कोणालाच माहीत नसते. तुझे अधिकारी अगदी असेच असतील.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तुझे सरदार झुंडींनी येणार्या टोळांसारखे आहेत, तुझे सेनापती टोळांच्या झुंडीसारखे आहेत; ते थंडीच्या दिवसांत कुंपणात तळ देतात व सूर्योदय होताच पळून जातात; ते कोठे गेले ते कोणास कळत नाही.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तुझे रक्षक टोळांसारखे आहेत, तुझे अधिकारी टोळांच्या झुंडीप्रमाणे आहेत थंडीच्या दिवसात ते भिंतीमध्ये वसतात— पण सूर्योदय होताच उडून जातात, आणि कुठे जातात ते कोणालाच कळत नाही.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तुझे राजपुत्रही झुंडीने येणाऱ्या टोळांसारखे आहेत आणि तुझे सेनापती टोळ्याच्या झुंडीप्रमाणे आहेत; ते थंडीच्या दिवसात कुंपणांमध्ये तळ देतात, पण जेव्हा सूर्य उगवतो तेव्हा ते कोठे उडून जातात ते कोणालाच माहीत नाही.