Nahum 3:19 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
निनवे, तुला खूप मार लागला आणि तुझी जखम कशानेही भरून येऊ शकत नाही. तुझ्या नाशाची बातमी एकताच प्रत्येकजण टाव्व्या वाजवितो सर्वानाच त्यामुळे आनंद वाटतो. का? कारण तू त्यांना नेहमी ज्या यातना दिल्यास, त्या ते विसरले नाहीत.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तुझी जखम भरत नाही; तुझा घाय असाध्य आहे; तुझी बातमी ऐकणारे सर्व तुझ्याविषयी टाळ्या पिटतात; कारण ज्याला तुझी दुष्टता सतत जाचली नाही असा कोण आहे?
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तुला कशानेही आरोग्य मिळणार नाही; तुझी जखम घातक आहे. तुझ्या दुर्दशेची बातमी जे कोणी ऐकतील ते सर्वजण आनंदाने टाळ्या वाजवितील, तुझ्या क्रूरतेचा उपद्रव ज्याला झाला नाही, असा कोण आहे?
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तुझी जखम बरी होणे शक्य नाही. तुझी जखम असाह्य आहे. तुझी बातमी ऐकणारे प्रत्येकजण टाळ्या वाजवतात. तुझ्या नित्य दुष्टतेतून कोण निसटला आहे?