Nahum 3:4 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
हे सर्व निनवेमुळे झाले निनवे अतिशय हाव असलेल्या वेश्येप्रमाणे आहे तिला आणखी हवे होते तिने स्वत:ला पुष्कळ राष्ट्रांना विकळे आणि आपल्या जादने त्यांना गुलाम बनविले.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
सुरूप व चेटकात निपुण अशा त्या वेश्येच्या बहुत व्यभिचारांमुळे हे घडले आहे; ती आपल्या व्यभिचारांनी राष्ट्रांचा, आपल्या चेटकांनी वंशांचा विक्रय करते.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
या सर्वांचे कारण, एका वेश्येच्या रंगेलपणाची वासना, ती भुलविणारी, जादूटोण्याची स्वामिनी आहे, तिने आपल्या वेश्यागिरीने राष्ट्रांना आणि जादूटोण्याने लोकांना गुलाम बनविले.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
हे सर्व सुंदर वेश्येच्या वासनामय कृतीमुळे घडले आहे, जी निपुण चेटकी आपल्या व्यभिचारांनी राष्ट्रांना आणि चेटकीण कृतीने लोकांस विकते.