Nehemiah 1:2 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
मी शूशन येथे असताना माझा हनानी नावाचा एक भाऊ आणि यहुदातील काही लोक तेथे आले. त्यांच्याकडे मी तेथे राहणाऱ्या यहुद्यांची चौकशी केली. हे युहदी म्हणजे बंदिवासातून सुटून अजून यहुदातच राहणारे लोक होते. यरुशलेम नगराचीही खुशाली मी त्यांना विचारली.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तेव्हा हनानी नावाचा माझा एक बांधव आणि इतर काही लोक यहूदातून आले; बंदिवासातून सुटलेल्यांपैकी जे यहूदी शेष राहिले होते त्यांच्याविषयी व यरुशलेमेविषयी त्यांच्याकडे मी विचारपूस केली.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
माझ्या यहूदी बांधवांपैकी हनानी नावाचा एक बंधू मला भेटण्यासाठी काही लोकांना बरोबर घेऊन यहूदीयाहून आला. बंदिवासातील अवशिष्ट यहूदाहचे व यरुशलेमचे कसे काय चालले आहे याची मी चौकशी केली.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
माझा हनानी नावाचा एक भाऊ आणि यहूदातील काही लोक तेथे आले. त्यांच्याकडे मी तेथे बंदिवासातून सुटका झालेल्यापैकी जे यहूदी बाकीचे राहिले होते त्यांच्याविषयी आणि यरूशलेमाविषयी मी त्यांची विचारपूस केली.