Nehemiah 1:4 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
यरुशलेमच्या लोकांची आणि नगराच्या तटबंदीची ही हकीकत ऐकून मी अत्यंत उद्विग्न झालो. मी खाली बसलो व रडू लागलो. मला अतिशय दु:ख झाले. कित्येक दिवस मी उपवास केला आणि स्वर्गातील देवाची प्रार्थना केली.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
हे ऐकताच मी खाली बसून रडू लागलो आणि बरेच दिवसपर्यंत विलाप करीत राहिलो; मी उपास करून स्वर्गींच्या देवाची प्रार्थना केली की,
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
हे ऐकताच मी खाली बसलो व रडू लागलो. त्यानंतर काही दिवस मी अन्नपाणी वर्ज्य केले व मी स्वर्गाच्या परमेश्वरासमोर मोठ्या शोकाने प्रार्थना करीत राहिलो.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
आणि हे ऐकताच मी खाली बसलो व रडू लागलो आणि कित्येक दिवस मी शोक व उपवास केला आणि स्वर्गीय देवापुढे प्रार्थना केली.