Nehemiah 1:9 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
पण तुम्ही माझ्याकडे परत आलात माझ्या आज्ञा पाळल्यात तर मी असे करीन: आपापली घरे बळजबरीने लागलेल्या तुमच्यातल्या लोकांनाही मी ठिकठिकाणांहून एकत्र आणीन. माझे नाव ठेवावे म्हणून जे ठिकाण मी निवडले तेथे मी त्यांना परत आणीन.”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
पण तुम्ही माझ्याकडे वळलात व माझ्या आज्ञा मानून त्याप्रमाणे चाललात तर तुमचे परागंदा झालेले लोक दिगंती असले तरी तेथून त्यांना एकत्र करून मी आपल्या नामाच्या निवासार्थ निवडलेल्या स्थानी आणीन.’
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
पण तुम्ही माझ्याकडे परत याल, माझ्या आज्ञा पाळाल, तर जगाच्या अगदी टोकाच्या कोपर्यातही बंदिवासात असलात, तरी मी तुम्हाला गोळा करून जे ठिकाण मी माझ्या नामाच्या निवासासाठी निवडले आहे तिथे आणेन.’
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
पण तुम्ही माझ्याकडे परत आलात व माझ्या आज्ञा पाळल्यात आणि तसे कराल तर आकाशाच्या अंतापर्यंत जरी पांगलेले असाल तरी मी त्यांना तेथून एकत्र करीन. माझ्या नावासाठी म्हणून जे ठिकाण मी निवडले तेथे मी त्यांना परत आणीन.”