Nehemiah 10:33 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
मंदिरातील मेजावर याजकांनी ठेवायच्या धान्यार्पणाची समर्पित भाकर, रोजचे अन्नार्पण आणि होमार्पण, शब्बाथ, नवचंद्रदिनी आणि नैमित्तिक सण यादिवशी करायची अर्पणे, इस्राएलींच्या शुध्दीकरणासाठी करायची पवित्रार्पणे आणि पापार्पणे, देवाच्या मंदिराच्या कामी येणारा खर्च हे सर्व खर्च या पैशातून भागतील.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
समर्पित भाकरी, नित्याचे अन्नार्पण, नित्याचे होमार्पण आणि शब्बाथ, चंद्रदर्शन आणि नेमलेले सण ह्यासंबंधाची बलिदाने आणि पवित्र वस्तू, इस्राएलाच्या प्रायश्‍चित्तासाठी पापार्पणे, ह्या सर्वांसाठी आमच्या देवाच्या मंदिराच्या कामी लागणारा खर्च आम्ही द्यावा.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
समक्षतेची खास भाकर; नियमित धान्यार्पणे व होमार्पणे; शब्बाथासाठी अर्पणे, अमावस्येचा सण आणि ठराविक सण; पवित्र अर्पणे; इस्राएलच्या प्रायश्चित्तविधीसाठी पापार्पणे; आणि परमेश्वराच्या भवनाची सेवा करण्याची जबाबदारीही आम्ही स्वीकारली.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मंदिरातील मेजावर याजकांनी ठेवायच्या अन्नार्पणाची समर्पित भाकर, रोजचे अन्नार्पण आणि होमार्पण, शब्बाथ, चंद्रदर्शन आणि नेमलेले सण यादिवशी करायची अर्पणे, इस्राएलींच्या प्रायश्चितासाठी करायची पवित्रार्पणे आणि पापार्पणे, देवाच्या मंदिराच्या कामी येणारा खर्च या पैशातून द्यावा.