Nehemiah 10:34 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
“दरवर्षी नेमलेल्या वेळी मंदिरात लाकडाची अर्पणे आणावी म्हणून आम्ही सर्वांनी याजक, लेवी व सर्व लोक यांनी चिठ्ठ्या टाकल्या आहेत. त्या चिठ्ठ्यांनुसार प्रत्येक कुटुंबाने परमेश्वर देवाच्या वेदीवर जाळण्यासाठी लाकूड आणायचे आहे. नियमशास्त्रात लिहिल्याप्रमाणे आपल्याला हे करायलाच हवे.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मग याजक, लेवी व इतर एकंदर लोक अशा आम्ही सर्वांनी पुढील कार्यांसाठी चिठ्ठ्या टाकल्या म्हणजे नियमशास्त्रात लिहिल्याप्रमाणे आमचा देव परमेश्वर ह्याच्या वेदीवर जाळण्यासाठी आपल्या पितृकुळांप्रमाणे वर्षानुवर्ष नियमित समयी आपल्या देवाच्या मंदिरात लाकडाची अर्पणे आणावीत.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
“आम्ही—याजक, लेवी आणि लोकांनी—लाकडांचा पुरवठा निर्धारित करण्यासाठी चिठ्ठ्या टाकल्या की आमच्या प्रत्येक कुटुंबांनी आमच्या परमेश्वराच्या भवनात आणावे जेणेकरून याहवेह आमच्या परमेश्वराच्या वेदीवर जाळण्यासाठी नियमशास्त्रात लिहिल्याप्रमाणे लाकूड आणायचे आहे.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मंदिरात लाकडाची अर्पणे आणावी म्हणून याजक, लेवी व सर्व लोक यांनी चिठ्ठ्या टाकल्या आहेत. त्या चिठ्ठ्यांनुसार प्रत्येक कुटुंबाने परमेश्वर देवाच्या वेदीवर जाळण्यासाठी नियमशास्त्रात लिहिल्या प्रमाणे लाकूड आणायचे आहे.