Nehemiah 10:37 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
“तसेच परमेश्वराच्या मंदिरातील कोठारांसाठी याजकांकडे पुढील गोष्टी आणू: पिठाचा पहिला उंडा. धान्यार्पणाचा पहिला भाग, आमच्या सर्व वृक्षांच्या फळांचा पहिला बहार, नवीन काढलेला द्राक्षारस आणि तेल यांचा पहिला भाग, या गोष्टी. तसेच लेवींना आमच्या पिकातला एक दशांश भाग देऊ. कारण ते सर्व नगरांतून आमच्या उत्पन्नाचा दहावा भाग घेतात.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
आणि आपण आपल्या मळलेल्या पिठाचा पहिला उंडा, समर्पित अंशाची अर्पणे, सर्व प्रकारच्या झाडांची फळे, द्राक्षारस व तेल हे याजकांकडे देवाच्या मंदिराच्या कोठड्यांत आणावे; आणि आपल्या जमिनीच्या उत्पन्नाचा दशमांश लेव्यांकडे न्यावा; कारण लेवी सर्व नगरांतून आमच्या शेतीच्या उत्पन्नाचा दशमांश घेत असतात.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
“याशिवाय आमच्या परमेश्वराच्या भवनातील कोठारासाठी याजकाकडे प्रथम दळलेले पीठ, आमचे धान्यार्पण व फलार्पण, नवा द्राक्षारस आणि जैतुनाच्या तेलाचा पहिला हिस्सा आणू. आम्ही आमच्या प्रत्येक उत्पन्नाचा एक दशांश लेव्यांना देण्याचे वचन दिले, कारण आम्ही जिथे काम करतो त्या सर्व नगरातून दशांश जमा करण्याची जबाबदारी लेव्यांची होती.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तसेच परमेश्वराच्या मंदिरातील कोठारांसाठी याजकांकडे पिठाचा पहिला उंडा. धान्यार्पणाचा पहिला भाग, आमच्या सर्व वृक्षांच्या फळांचा पहिला बहर, नवीन काढलेला द्राक्षरस आणि तेल यांचा पहिला भाग, या गोष्टी आणू. तसेच लेवींना आमच्या पिकातला एक दशांश भाग देऊ. कारण आम्ही काम करत असलेल्या सर्व नगरांतून आमच्या उत्पन्नाचा दहावा भाग लेवी घेतात.