Nehemiah 11:17 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
मत्तन्या, (हा मीखाचा मुलगा मीखा जब्दीचा आणि जब्दी आसाफचा. आसाफ गानवृंदाचा प्रमुख होता. ईशस्तुती आणि प्रार्थनागीते म्हणताना तो आरंभ करी व लोक पाठोपाठ म्हणत.) व बकबुक्या (भाऊबंदांमध्ये त्याचा अधिकार दुसरा होता) आणि शम्मूवाचा मुलगा अब्दा, (शम्मूवा गालालाचा मुलगा, गालाल यदुथूनाचा)
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
आणि प्रार्थनेच्या वेळी ईशोपकारस्मरण आरंभण्याच्या कामी मत्तन्या बिन मीखा बिन जब्दी बिन आसाफ हा मुख्य होता व बकबुक्या आपल्या भाऊबंदातला दुसरा होता; आणि अब्दा बिन शम्मूवा बिन गालाल बिन यदूथून हाही होता.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
मत्तन्याह, हा मीखाहचा पुत्र, तो जब्दीचा पुत्र, जो आसाफाचा पुत्र, तो उपकारस्तुतीत व प्रार्थनेत नेतृत्व करणारा प्रमुख होता; बकबुकियाह, त्याच्या सहकाऱ्यातील दुसरा; आणि अब्दा, हा शम्मुवाचा पुत्र, तो गालालचा पुत्र, जो यदूथूनाचा पुत्र होता.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मत्तन्या, हा मीखाचा पुत्र मीखा जब्दीचा आणि जब्दी आसाफचा. आसाफ गानवृंदाचा प्रमुख होता. ईशस्तुती आणि प्रार्थनागीते म्हणताना तो आरंभ करी व लोक पाठोपाठ म्हणत व बकबुक्या भाऊबंदांमध्ये त्याचा अधिकार दुसरा होता आणि शम्मूवाचा पुत्र अब्दा, शम्मूवा गालालाचा पुत्र, गालाल यदूथूनाचा