Nehemiah 12:35 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
काही याजकही त्यांच्यापाठोपाठ रणशिंग वाजवत भिंतीकडे निघाले. जखऱ्या देखील त्यांच्या मागे निघाला. (जखऱ्या योनाथानचा मुलगा, योनाथान शमयाचा मुलगा, शमया मत्तन्याचा, मत्तन्या मिखाचा, मिखाचा जक्कूरचा आणि जक्कूर आसाफचा मुलगा)
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
व कित्येक याजकांचे पुत्र कर्णे घेऊन चालले; जखर्‍या बिन योनाथान बिन शमया बिन मत्तन्या बिन मीखाया बिन जक्कूर बिन आसाफ,
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तसेच काही याजकांनी कर्णे वाजविले आणि जखर्‍याह, योनाथानाचा पुत्र, तो शमायाहचा पुत्र, तो मत्तन्याहचा पुत्र, तो मिखायाहचा पुत्र, तो जक्कूराचा पुत्र, तो आसाफाचा पुत्र होता,
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
काही याजकांचे पुत्र त्यांच्यापाठोपाठ रणशिंग वाजवत भिंतीकडे निघाले. जखऱ्या देखील त्यांच्यामागे निघाला. आसाफाचा पुत्र जक्कूर, जक्कूरचा पुत्र मिखाया, मिखायाचा पुत्र मत्तन्या, मत्तन्याचा पुत्र शमाया, शमायाचा पुत्र योनाथान, योनाथानाचा पुत्र जखऱ्या.