Nehemiah 12:36 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
आसाफचे भाऊ म्हणजे शमया, अजरेल, मिललई, गिललइ, माई नथनेल, यहूदा, हनानी हे ही वाद्ये घेऊन निघाले. ही वाद्ये देवाचा माणूस दावीद याने केली होती. भिंत अर्पण करण्यासाठी जो लोकांचा गट आलेला होता त्यांना एज्रा हा लेखक पुढे घेऊन गेला.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
आणि त्याचे भाऊबंद शमया, अजरेल, मिललई, गिललई, माई, नथनेल, यहूदा व हनानी हे देवाचा मनुष्य दावीद ह्याची वाद्ये घेऊन चालले आणि त्यांच्यापुढे एज्रा शास्त्री चालला;
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
त्याचे सहकारी—शमायाह, अजरएल, मिललई, गिललई, माई, नथानेल, यहूदाह व हनानी—यांनी परमेश्वराचा मनुष्य दावीदाने नेमून दिलेली वाद्ये वापरली. एज्रा शास्त्राचा शिक्षक त्यांच्या अग्रभागी चालला होता.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
आसाफचे भाऊ म्हणजे शमाया, अजरेल, मिललई, गिललई, माई नथनेल, यहूदा, हनानी हे ही वाद्ये घेऊन निघाले. ही वाद्ये देवाचा मनुष्य दावीद याने केली होती. एज्रा हा लेखक त्यांच्यापुढे होता.