Nehemiah 12:43 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
या खास दिवशी याजकांनी बरेच यज्ञ केले. सर्वजण अतिशय आनंदात होते. देवाने सर्वांना आनंदित केले होते. बायका आणि मुलेसुध्दा अतिशय हर्षभरित झाली होती. दूरवरच्या लोकांनाही यरुशलेममधला आनंदाचा जल्लोष ऐकू येत होता.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
त्या दिवशी लोकांनी मोठे यज्ञ करून आनंद केला, कारण त्यांनी आनंदीआनंद करावा असे देवाने केले होते; बायकामुलांनीही आनंद केला; यरुशलेमेचा आनंदध्वनी दूर जाऊन पोहचला.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
या आनंदाच्या दिवशी अनेक मोठमोठी अर्पणे करण्यात आणली, कारण परमेश्वराने त्यांना फार मोठा हर्ष दिला होता. स्त्रिया व मुलांनी देखील आनंद व्यक्त केला. यरुशलेममधील लोकांच्या आनंदाचे निनाद दूरवर ऐकू आले.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
या खास दिवशी याजकांनी बरेच यज्ञ केले आणि आनंदोत्सव केला, सर्वजण अतिशय आनंदात होते. कारण देवाने सर्वांना आनंदीत केले होते. स्त्रिया आणि बालकेसुध्दा अतिशय हर्षभरित झाली होती. दूरवरच्या लोकांसही यरूशलेम मधला आनंदाचा जल्लोष ऐकू येत होता.