Nehemiah 12:44 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
त्यादिवशी कोठारांवरील लोकांच्या नेमणुका केल्या आपल्या झाडांची पहिली फळे वहिली आणि धान्यातला एकदशांश वाटा लोक घेऊन आले. कोठारप्रमुखांनी या वस्तू कोठारात ठेवल्या. सेवेत असलेले याजक व लेवी यांच्याबद्दल यहुद्यांना अतिशय समाधान होते. म्हणून त्यांनी कोठारात ठेवायला पुष्कळशा गोष्टी आणून दिल्या.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
याजक व लेवी ह्यांचे ठरलेले वाटे नगरोनगरीच्या शेतांप्रमाणे गोळा करावेत म्हणून त्या दिवशी भांडारे, परमेश्वराप्रीत्यर्थ समर्पित अंश, प्रथमफळे व दशमांश ह्यांच्या कोठड्यांवर लोक नेमण्यात आले; कारण याजक व लेवी हे हजर राहिल्याकारणाने यहूदास आनंद झाला होता.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
त्यावेळी प्रथम हंगामाची अर्पणे व दशांश या अर्पणांच्या भांडारावर पुरुष अधिकारी नेमण्यात आले. ही सर्व अर्पणे मोशेच्या नियमशास्त्रात सांगितल्याप्रमाणे सभोवतीच्या नगरींच्या शेतांप्रमाणे अर्पणे याजक व लेवींना नेमून देण्यात आली, त्यांनी ती गोळा करून भांडारात जमा करावयाची होती. कारण यहूदीयाच्या लोकांना लेवी व याजक आणि त्यांचे सेवाकार्य यांचे कौतुक वाटत होते.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
त्यादिवशी भांडार, अर्पणे, प्रथमफळे दशांश यांच्या कोठारांवर अर्पणे गोळा करण्यासाठी लोकांच्या नेमणुका केल्या. त्या अर्पणातील काही भाग याजक व लेवी यांच्यासाठी नियमशास्त्राप्रमाणे होता. समोर उभ्या असलेल्या याजक व लेवी यांच्यासाठी यहूदातील लोकांनी आनंद केला.