Nehemiah 13:2 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
या लोकांनी इस्राएली लोकांना अन्न आणि पाणी दिले नव्हते म्हणून हा नियम लिहिला गेला. शिवाय बलामने इस्राएलींना शाप द्यावा म्हणून या लोकांनी त्याला पैसेही देले होते. पण आपल्या देवाने त्या शापाचे आशीर्वादात रूपांतर केले.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
कारण ते अन्नपाणी घेऊन इस्राएल लोकांना सामोरे आले नाहीत, पण उलट शाप द्यावा म्हणून बलामास त्यांनी दक्षिणा देऊन बोलावले; तरी आमच्या देवाने त्या शापाचा आशीर्वाद केला.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
कारण त्यांनी इस्राएली लोकांना अन्न व पाण्याचा पुरवठा केला नाही. उलट त्यांनी त्यांना शाप देण्यासाठी बलामाला पैसे देऊन बोलाविले. (पण परमेश्वराने त्या शापाचे रूपांतर आशीर्वादात केले ही गोष्ट वेगळी.)
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
या लोकांनी इस्राएली लोकांस अन्न आणि पाणी दिले नव्हते. परंतु बलामाने इस्राएलींना शाप द्यावा म्हणून त्यांनी त्यास पैसेही देले होते. पण आपल्या देवाने त्या शापाचे आशीर्वादात रूपांतर केले.