Nehemiah 13:26 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
अशा विवाहांमुळेच शलमोनाच्या हातून पाप झाले. हे तुम्हाला माहीत आहे. शलमोनसारखा थोर किती तरी राष्टांमध्ये नव्हता. देवाचा शलमोनवर लोभ होता. देवाने सर्व इस्राएलवर शलमोनला राजा केले. पण परक्या स्त्रियांमुळे शलमोनही पाप करायला उद्युक्त झाला.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
इस्राएलाचा राजा शलमोन अशाच प्रकारच्या गोष्टींनी पापमग्न झाला होता ना? पुष्कळ राष्ट्रांत त्याच्यासारखा कोणी राजा झाला नाही; तो देवाचा आवडता असून त्याला सर्व इस्राएलावर राजा केले होते, तरी त्यालाही अन्य जातींच्या स्त्रियांनी पापात पाडले.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
शलोमोन राजा अशाच प्रकारच्या गोष्टींनी पापमग्न झाला नव्हता काय? त्याच्याशी तुलना करता येईल असा दुसरा राजा अनेक राष्ट्रांमध्ये नव्हता आणि परमेश्वराने त्याच्यावर प्रीती केली व त्याला संपूर्ण इस्राएलचा राजा केले. असे असूनही त्याला यहूदीतर स्त्रियांनी पापाकडे वळविले.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
अशा विवाहांमुळेच शलमोनाच्या हातून पाप झाले. पुष्कळ राष्ट्रात त्याच्यासारखा कोणी राजा नव्हता. तो आपल्या देवाला प्रिय होता आणि देवाने सर्व इस्राएलावर त्यास राजा केले. पण अन्य जातीच्या स्त्रियांनी त्यालाही पापात पाडले.