Nehemiah 2:10 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
सनबल्लट आणि तोबीया यांना माझा बेत ऐकून माहीत होता. इस्राएलींच्या मदतीसाठी कोणी एक जण आला आहे याने ते नाराज झाले व रागावले. सनबल्लट होरोन या गावचा होता आणि तोबीय अम्मोनी आधिकारी होता.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
कोणी मनुष्य इस्राएल वंशाचे कल्याण साध्य करण्यास आला आहे हे होरोनी सनबल्लट आणि अम्मोनी तोबीया नावाचा दास ह्या दोघांनी ऐकले, तेव्हा त्यांना फार वाईट वाटले.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
पण होरोनी सनबल्लट व अम्मोनी अधिकारी तोबीयाह यांना हे जेव्हा समजले तेव्हा ते फारच अस्वस्थ झाले, की कोणीतरी इस्राएलला मदत करण्यासाठी आले आहे.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
होरोनी शहराचा सनबल्लट आणि अम्मोनी तोबीया यांना माझा बेत ऐकून माहीत होता, इस्राएलींच्या मदत शोधण्यासाठी कोणी एकजण आला आहे म्हणून ते खूप नाराज झाले.