Nehemiah 2:7 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
मी पुढे राजाला असेही म्हणालो, “राजाची माझ्यावर मेहेरनजर असेल तर माझी आणखी एक विनंती आहे. फरात नदीच्या पश्चिमेकडील अधिकाऱ्यांसाठी काही पत्रे मला द्यावीत. म्हणजे ती त्यांना दाखवल्यावर यहुदाच्या वाटेवर त्यांच्या हद्दीतून सुखरुप जायला ते मला परवानगी देतील.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मग मी राजाला म्हणालो, “महाराजांच्या मर्जीस आल्यास मी यहूदा देशात पोहचेपर्यंत महानदाच्या पश्‍चिमेकडील प्रदेशातून जाऊ देण्याविषयी तेथल्या अधिपतींच्या नावांवर मला पत्रे द्यावीत;
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
पुढील गोष्टींसाठी देखील मी विनंती केली, “महाराज, आपण माझ्यावर प्रसन्न असाल, तर कृपा करून फरात नदीच्या पश्चिमेकडील राज्यपालांसाठी मजजवळ पत्रे द्यावी, म्हणजे त्यांनी मला त्यांच्या प्रांतातून यहूदीयाला सुखरुपपणे प्रवास करू द्यावा.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मग मी राजाला असेही म्हणालो, “राजाची माझ्यावर मर्जी असेल तर माझी आणखी एक विनंती आहे. मी यहूदा देशी पोहचेपर्यंत नदीच्या पश्चिमेकडील प्रदेशातून जाऊ देण्याविषयी तेथल्या अधिकाऱ्यांच्या नावानिशी पत्रे द्यावीत.