Nehemiah 2:8 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
शिवाय दरवाजे, भिंती, प्रार्थनामंदिराच्या भोवतालच्या भिंती आणि माझे घर यांच्यासाठी मला मजबूत लाकूड लागणार आहे. त्यासाठी राजाचा वनाधिकारी आसाफ याला द्यायला मला पत्र द्यावे.” राजाने मला तशी पत्रे आणि मी मागितले ते सर्व काही दिले. देवाची माझ्यावर कृपा असल्यामुळे राजाने हे दिले.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
आणि महाराजांच्या जंगलाचा अधिपती आसाफ ह्याला असे पत्र द्यावे की मंदिराच्या गढीच्या दरवाजांसाठी तुळया काढण्यासाठी, शहराच्या कोटासाठी आणि मी जाऊन राहीन त्या घरासाठी त्याने मला लाकडे द्यावीत.” माझ्या देवाचा वरदहस्त माझ्यावर होता म्हणून राजाने माझी मागणी मान्य केली.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
एक पत्र शाही जंगलाचा व्यवस्थापक आसाफ यांच्यासाठीही द्यावे. त्या पत्रामध्ये मंदिराशेजारी असलेल्या गढीच्या दरवाजांसाठी, शहराच्या कोटासाठी व माझ्या घराला लागणार्या तुळयांसाठी लाकूड देण्याबद्दल त्याला आज्ञा द्यावी.” माझ्यावर परमेश्वराची हस्तकृपा असल्यामुळे राजाने या विनंत्या मान्य केल्या.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
प्रार्थनामंदिराच्या भोवतालच्या व नगराच्या भिंती आणि माझे घर यांच्यासाठी मला मजबूत लाकूड लागणार आहे. त्यासाठी राजाचा वनाधिकारी आसाफ याला पत्र द्यावे.” राजाने मला तशी पत्रे आणि मी मागितले ते सर्वकाही दिले. देवाची माझ्यावर कृपा असल्यामुळे राजाने हे दिले.