Nehemiah 3:1 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
मुख्य याजकाचे नाव होते एल्याशीब. एल्याशीब आणि त्याचे याजक बांधव उठून कामाला लागले आणि त्यांनी मेंढेवेस बांधली. त्यांनी पवित्र परमेश्वरासाठी प्रार्थनापूर्वक तिची प्रतिष्ठापना केली. दरवाजे भिंतीत बसवले. हमेयाचा बुरुज (म्हणजे शंभराचा बुरुज) आणि हनानेल बुरुज इथपर्यंत या याजकांनी यरुशलेमच्या तटबंदीचे काम केले. त्यांनी पवित्र परमेश्वरासाठी आपल्या कामाची प्रार्थनापूर्वक प्रतिष्ठापना केली.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मग मुख्य याजक एल्याशीब व त्याचे याजकबांधव उठून मेंढेवेस बांधू लागले; त्यांनी तिची प्रतिष्ठापना करून तिला कवाडेही लावली; हमेआ बुरुजापर्यंत, हनानेल बुरुजापर्यंत त्यांनी तिची प्रतिष्ठापना केली.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
मुख्य याजक एल्याशीब आणि इतर याजकांनी काम सुरू करून मेंढे वेस परत बांधली. ती समर्पित केली आणि तिला दारे लावली, हनानेल मनोऱ्यापासून शंभराचा बुरूज येथपर्यंत बांधकाम केले.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मग मुख्य याजक एल्याशीब आपल्या याजक भावांबरोबर उठला आणि त्यांनी मेंढेवेस बांधली. त्यांनी ती पवित्र करून दरवाजे त्याच्याजागी बसवले. हमेआ बुरुजापर्यंत आणि हनानेल बुरुजापर्यंत ती त्यांनी पवित्र केली.