Nehemiah 3:13 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
हानून नावाचा एक जण आणि जानोहे येथे राहाणारे लोक यांनी खोऱ्याच्या वेशीची दुरुस्ती केली. ही वेस बांधून त्यांनी दारे बिजागाऱ्यांवर उभी केली. मग या दारांना त्यांनी कड्या व अडसर घातले. शिवाय त्यांनी पाचशे याई लांबीची भिंतही दुरुस्त केली. थेट उकिरड्याच्या वेशीपर्यंत त्यांनी ही डागडुजी केली.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
खोरेवेशीची डागडुजी हानून व जानोहेकरांनी केली; त्यांनी ती बांधून तिला कवाडे, कड्या व अडसर लावले, तसेच उकिरडावेशीपर्यंत एक हजार हात कोट बांधला.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
हानून व जानोह येथील लोकांनी खोरे वेशीची डागडुजी केली. तिचे दरवाजे उभे करून त्यांना कड्या, अडसर व गजही लावले. नंतर त्यांनी उकिरडा वेशीपर्यंतच्या एक हजार हात लांबीच्या तटाची दुरुस्ती केली.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
हानून नावाचा एकजण आणि जानोहा येथे राहणारे लोक यांनी खोऱ्याच्या वेशीची दुरुस्ती केली. ही वेस बांधून त्यांनी दारे बिजागाऱ्यांवर उभी केली. मग या दारांना त्यांनी कड्या व अडसर घातले. त्यांनी उकिरडा वेशीपर्यंत एक हजार हात लांबीची दुरुस्ती केली.