Nehemiah 3:15 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
कोलहोजेचा मुलगा शल्लूम याने कारंज्याजी वेस दुरुस्त केली. शल्लूम मिस्पा जिल्ह्याचा अधिकारी होता. त्याने वेस बांधून तिला छप्पर केले. वेशीचे दरवाजे बिजागऱ्यांसह लावले. मग दारांना कड्या व अडसर बसवले. शिवाय त्याने राजाच्या बागेलगतच्या सिल्लोम लळयाची भिंतही बांधली. दावीद नगरातून पायऱ्या उतरतात तिथपर्यंत त्याने डागडुजी केली.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
झरावेशीची डागडुजी मिस्पा जिल्ह्याचा अधिकारी शल्लूम बिन कोल-होजे ह्याने केली; तसेच त्याने ती बांधून तिला छप्पर केले व कवाडे, कड्या व अडसर लावले; तसेच त्याने दावीदपुराहून उतरण्याच्या जिन्यापर्यंत राजाच्या बागेजवळील शेलह तळ्याचा कोट बांधला.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
कोल-होजेचा पुत्र शल्लूम मिस्पाह जिल्ह्याचा अधिकारी होता. त्याने झरा वेशीची दुरुस्ती करून ती परत बांधली, तिच्यावर छत टाकले व दरवाजे उभे करून त्यांना अडसर व गज लावले. नंतर शेलाह तळ्यापासून राजाच्या बागेपर्यंतच्या, यरुशलेमच्या दावीदाच्या नगराच्या उतारावरील पायर्‍यापर्यंतच्या कोटाची त्याने दुरुस्ती केली.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मिस्पा जिल्ह्याचा अधिकारी कोलहोजेचा पुत्र शल्लून याने झरावेशीची डागडुजी याने केली. त्याने वेस बांधून तिला छप्पर केले आणि वेशीचे दरवाजे बिजागऱ्यांसह लावले. मग दारांना कड्या व अडसर बसवले. शिवाय त्याने राजाच्या बागेलगतच्या शेलह तळयाची भिंतही बांधली. दावीद नगरातून पायऱ्या उतरण्याच्या जिन्यापर्यंत त्याने डागडुजी केली.