Nehemiah 3:25 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
उजई याचा मुलगा पलाल याने बुरजालगतच्या भिंतीच्या वळणापासूनची दुरुस्ती केली. ही बुरुज राजाच्या वरच्या घराजवळ होता. म्हणजेच राजाच्या पहारेकऱ्यांच्या चौकालगत होता. त्यांनंतर परोशचा मुलगा पदाय याने दुरुस्ती केली.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
कोट वळसा घेतो त्यासमोर गारद्यांच्या अंगणाजवळ राजमंदिराबाहेर असलेल्या उंच बुरुजाची डागडुजी पलाल बिन उजई ह्याने केली. त्याच्या शेजारी पदाया बिन परोश ह्याने डागडुजी केली.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
उजईचा पुत्र पलालने कोट कोपर्‍यापासून राजवाड्याच्या वरच्या माळाजवळील तुरुंगाच्या अंगणापर्यंत काम करून बुरुजाचीही डागडुजी केली. त्याच्या शेजारी पारोशाचा पुत्र पदायाहनेही डागडुजी केली.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
उजई याचा पुत्र पलाल याने बुरजालगतच्या भिंतीच्या वळणापासूनची दुरुस्ती केली. हा बुरुज राजाच्या वरच्या घराजवळ होता. म्हणजेच राजाच्या पहारेकऱ्यांच्या चौकालगत होता. त्यानंतर परोशाचा पुत्र पदाय याने दुरुस्ती केली.