Nehemiah 3:4 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
उरीयाचा मुलगा मेरेमोथ याने या तटबंदीच्या पुढच्या भागाची डागडूजी केली. (उरीया हा हक्कोस याचा मुलगा.) बरेख्याचा मुलगा मशुल्लाम याने त्याच्या पुढच्या भागाचे काम केले. (बरेख्या मशेजबेलचा मुलगा.) बावाचा मुलगा सादोक याने त्यापुढील भागाची दुरुस्ती केली.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
त्यांच्या शेजारी मरेमोथ बिन उरीया बिन हक्कोस ह्याने डागडुजी केली. त्यांच्या शेजारी मशुल्लाम बिन बरेख्या बिन मशेजबेल ह्याने डागडुजी केली. त्यांच्या शेजारी सादोक बिन बाना ह्याने डागडुजी केली.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
हक्कोसचा पुत्र उरीयाह, त्याचा पुत्र मरेमोथाने तटाचा पुढचा भाग दुरुस्त केला. त्याच्या शेजारी मशुल्लाम, बेरेख्याहचा पुत्र, जो मशेजबेलचा पुत्र, त्याने दुरुस्ती केली आणि बाअनाहाचा पुत्र सादोक दुरुस्ती करीत होते.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
हक्कोस उरीयाचा पुत्र मरेमोथ याने या तटबंदीच्या पुढच्या भागाची डागडूजी केली. उरीया हा हक्कोस याचा पुत्र. बरेख्याचा पुत्र मशुल्लाम याने त्याच्या पुढच्या भागाचे काम केले. बरेख्या मशेजबेलचा पुत्र बानाचा पुत्र सादोक याने त्यापुढील भागाची दुरुस्ती केली.