Nehemiah 3:8 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
हरह याचा मुलगा उज्जियेल याने पुढच्या भागाची डागडुजी केली. उज्जियेल सोनार होता. हनन्या हा सुगंधी द्रव्ये करणाऱ्यांपैकी होता. या लोकांनी रुंद कोटापर्यंत यरुशलेमची डागडुजी केली.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
त्यांच्या शेजारी सोनारांपैकी उज्जीएल बिन हरहया ह्याने डागडुजी केली. त्याच्या शेजारी गांध्यांपैकी हनन्या ह्याने डागडुजी केली. त्यांनी रुंद कोटापर्यंत यरुशलेमेची मजबुती केली.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
हरहयाहचा पुत्र उज्जीएल व्यवसायाने सोनार होता, त्यानेही पुढच्या तटाची डागडुजी केली. त्याच्या शेजारी अत्तरे तयार करणारा हनन्याह होता. त्यानेसुद्धा डागडुजी केली. या दोघांनी यरुशलेमातील रुंद भिंती पर्यंत डागडुजी केली.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
हरह याचा पुत्र उज्जियेल याने पुढच्या भागाची डागडुजी केली, उज्जियेल सोनार होता आणि हनन्या हा सुगंधी द्रव्ये करणाऱ्यांपैकी होता. या लोकांनी रुंद कोटापर्यंत यरूशलेमेची मजबुती केली.