Nehemiah 4:2 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
सनबल्लटने आपले मित्र आणि शोमरोन येथील सैन्य यांच्याशी बातचीत केली. तो म्हणाला, “हे दुबळे यहुदी करताहेत तरी काय? आपण त्यांची गय करु असे त्यांना वाटते? आपण यज्ञ करु असे त्यांना वाटते की काय? अगदी एका दिवसात आपण सगळे बांधकाम पुरे करु असे त्यांना वाटत असावे. या उकिरड्यातून आणि घाणीतून ते पुन्हा दगडांना सजीव करु शकणार नाहीत. ते निव्वळ राखेचे आणि उकिरड्याचे ढीग आहेत.”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तो आपले बांधव व शोमरोनचे सैन्य ह्यांच्यासमोर म्हणाला, “हे दुर्बळ यहूदी काय करणार? ते तटबंदी करणार काय? ते यज्ञ करणार काय? ते एका दिवसात सर्व काम आटोपणार काय? आच खाल्लेले पाषाण मातीच्या ढिगार्यातून निवडून घेऊन ते पुन्हा कामास लागण्याजोगे करतील काय?”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
आपले सोबती व शोमरोनचे सेनाधिकारी यांच्यादेखत थट्टा करीत तो म्हणाला, “हे दुबळे यहूदी काय करीत आहेत? ते तटाची पुनर्बांधणी करू शकतील काय? ते अर्पणे वाहू शकतील काय? एका दिवसात ते कामे संपवू शकतील काय? मातीच्या ढिगार्यातून उपसून काढलेल्या दगडात ते प्राण घालू शकतील काय—ते तर पार जळून गेलेले दगड!”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
सनबल्लटाने आपले भाऊबंद आणि शोमरोन येथील सैन्य यांच्या उपस्थितीत, तो म्हणाला, “हे दुबळे यहूदी काय करत आहेत? ते आपणासाठी नगर स्थापित करतील काय? ते यज्ञ करतील काय? एका दिवसात सगळे बांधकाम पुरे करतील काय? या उकिरड्यातून आणि घाणीतून ते पुन्हा दगडांना सजीव करतील काय?”