Nehemiah 4:7 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
पण सनबल्लट तोबीया, अरबी, अम्मोनी आणि अश्दोदी यांचा मात्र फार संताप झाला. लोकांनी यरुशलेमच्या भिंतीचे काम सुरुच ठेवले आहे हे त्यांनी ऐकले. भिंतीला पडलेली भगदाडे ते बुजवत आहेत हे ही त्यांच्या कानावर आले.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
यरुशलेमेचा कोट बांधण्याचे काम झपाट्याने चालले आहे, त्यातली खिंडारे बुजू लागली आहेत असे सनबल्लट, तोबीया, अरबी, अम्मोनी व अश्दोदी ह्यांनी ऐकले तेव्हा त्यांना फार राग आला;
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
पण सनबल्लट, तोबीयाह अरबी, अम्मोनी व अश्दोदी यांनी ऐकले की यरुशलेमच्या तटाचे काम झपाट्याने पुढे चालले आहे आणि तटाची खिंडारे बुजू लागलेली आहेत, तेव्हा ते अतिशय संतप्त झाले.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
पण जेव्हा सनबल्लट, तोबीया, अरबी, अम्मोनी आणि अश्दोदी यांचा मात्र फार संताप झाला. लोकांनी यरूशलेमेच्या भिंतीचे काम सुरुच ठेवले आहे हे त्यांनी ऐकले. भिंतीला पडलेली भगदाडे ते बुजवत आहेत हे ही त्यांच्या कानावर आले.