Nehemiah 5:13 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
मग मी माझ्या वस्त्रावरच्या चुण्या झटकत म्हणालो, “आपले वचन जो पाळत नाही त्या प्रत्येकाची गत देव अशीच करतो. देव त्यांना त्यांच्या घरातून झटकून टाकील. ज्यासाठी त्यांनी कामधंदा केला ते त्यांच्यापासून हिरावून घेतले जाईल. तो माणूस सर्वस्वाला मुकेल.” माझे सांगून झाले. आणि सर्वजण त्याच्याशी सहमत झाले. ते सर्व म्हणाले, “आमेन!” मग त्यांनी परमेश्वराचे गुणगान केले. आपल्या वचनाप्रमाणे लोक वागले.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
ह्यावर मी आपला पदर झटकून म्हणालो, “जो कोणी ह्या वचनाप्रमाणे करणार नाही त्याला परमेश्वर त्याच्या घरातून व त्याच्या उद्योगावरून झटकून टाकील ह्याप्रमाणे तो झटकला जाऊन खंक होईल.” तेव्हा सर्व मंडळीने म्हटले, “आमेन” व त्यांनी परमेश्वराचे स्तवन केले. मग लोकांनी आपण दिलेल्या वचनाप्रमाणे केले.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
व माझ्या अंगरख्याची दुमड धरून तो झटकून म्हटले, “जो कोणी या शपथेचे पालन करणार नाही, परमेश्वर त्याची घरे व त्याची संपत्ती असेच झटकून टाकेल. तर असा मनुष्य असाच झटकला जाऊन पूर्णपणे रिकामा होवो!” यावर सभेतील सर्व लोक म्हणाले, “आमेन” आणि त्यांनी याहवेहची स्तुती केली. सर्व लोकांनी आपल्या वचनाप्रमाणे केले.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मग मी आपला पदर झटकून म्हणालो, “आपले वचन जो पाळणार नाही त्यास देव त्यांना त्यांच्या घरातून आणि मालमत्तेपासून झटकून टाकील. तो मनुष्य सर्वस्वाला मुकेल.” ते सर्व म्हणाले, “आमेन!” मग त्यांनी परमेश्वराचे गुणगान केले. आपल्या वचनाप्रमाणे लोक वागले.